अन्नपूर्णा अक्षयपात्र

श्री संस्थेच्या स्वयंपूर्णतेचे महत्त्वपूर्ण उदाहरण ‘अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा’ व ‘केंद्रीय भांडारगृह’ या विभागांच्या माध्यमातून पाहावयास मिळते. या सुमारे 25 एकरच्या विस्तीर्ण परिसरातील विभागामध्ये श्री संस्थेच्या वस्तू साठवणींचे आणि निर्माणकार्याचे केंद्र एकत्रितरीत्या कार्यरत आहे.

अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा : येथे अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा, भाजीभांडार व लाडू प्रसाद हे विभाग नित्यनेमाने कार्यरत असतात. दररोज तसेच विविध उत्सवांच्या कालावधीत ‘श्रीं’चा महाप्रसाद तसेच प्रसादालयासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे अन्नपदार्थ व अल्पोपाहाराचे पदार्थ येथेच तयार केले जातात. या पाकशाळेमध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले स्वच्छतेच्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व पदार्थ अत्याधुनिक यंत्राद्वारे अत्यंत भक्तिभावाने तयार केले जातात.

 

या परिसरामध्ये श्री संस्थेचे मध्यवर्ती भांडारगृह, धान्य भांडारगृह, आटा प्लान्ट, आर.ओ. वॉटर प्लान्ट या सोबतच, श्री मंदिर निर्माण कार्य, मोटार निर्माण कार्य, फॅब्रिकेशन कार्यशाळा, फर्निचर कार्यशाळा व अग्निशमन विभाग आहेत.

 

त्यासोबतच, विविध विभागांचे स्टोअर्स उदा. बांधकाम विभाग स्टोअर, पाणी पुरवठा व विद्युत विभाग स्टोअर, श्री कापड प्रसाद स्टोअर, भजनी साहित्य स्टोअर, वाङ्मय विभाग स्टोअर, मेडिकल स्टोअर, जनरल स्टोअर यासोबतच बागबगीचा विभाग, सर्व्हिसिंग सेंटर, लॉन्ड्री विभाग आणि वे-ब्रिज इत्यादी विभाग कार्यरत आहेत.

 

श्री संस्थेच्या ४२ सेवाकार्यांच्या अखंड प्रवाहामध्ये, केंद्रीय भांडारगृहाच्या माध्यमातून सर्व विभाग आणि आठही सेवाकेंद्रांना आवश्यक ते साहित्य विभागनिहाय मागणीनुसार पुरविले जाते.