वाङमय विभाग
श्रींच्या अलौकिक अवतार कार्यावर ग्रंथ लिहीणारे संतकवी आधुनिक महिपती ह.भ.प. संतकवि श्री दासगणू महाराज यांचा श्री गजानन विजय ग्रंथ हा संस्थेने अधिकृत ग्रंथ म्हणुन प्रकाशित केलेला आहे.
आजपर्यंत या ग्रंथाच्या मराठीत ५६ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून या आवृतीपर्यंत एकूण ग्रंथ संख्या ३३,२४,६०० झालेली आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, तेलगु व तमिळ या भाषांमध्येही या ग्रंथाचा अनुवाद करण्यात आलेला आहे. भावभक्तीने या ग्रंथाचे पारायण केले असता अनुभूतीची प्रचिती आल्याचा असंख्य भक्तांचा अनुभव आहे.
श्री महाराजांच्या अवतार लीलांची महती भक्तांना कळावी म्हणून श्री गजानन महाराजांचे अधिकृत वाङमय संस्थानने उपलब्ध करून दिले आहे.
