श्री दर्शनबारी

श्री क्षेत्र शेगांव संतनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या पुण्यनगरीत श्रीं च्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी नित्य हजारो भाविक दाखल होतात. या दर्शनार्थींना श्रीं च्या दर्शनाचा लाभ विनासायास घडावा

यासाठी श्री संस्थेने दर्शनबारी ही भव्य वास्तू निर्माण केली आहे.

दर्शनबारीच्या माध्यमातून एकाचवेळी हजारो भाविकांना श्रीं चे दर्शन अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने घडते.

श्रीं च्या समाधी दर्शनार्थ आलेल्या भक्तजनांना श्री दर्शनबारीच्या माध्यमातून

श्रीं चे थेट गाभाऱ्यातील दर्शन तसेच श्रीं चे मुखदर्शन घेण्याची व्यवस्था आहे.

श्रीं चे थेट तसेच मुखदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तजनांच्या माहितीकरिता

श्री दर्शनार्थ किती वेळ लागेल हे सूचित करणारा फलक लावलेला आहे.

 

श्री दर्शनबारी

दर्शनबारीमध्ये असणाऱ्या सुविधा

श्री दर्शन हॉल (दर्शनबारी)

श्री दर्शन हॉल (दर्शनबारी)

वर्षभर दर्शनार्थी भक्तांचा ओघ वाढत असतो, करिता दर्शनरांगेचे नियोजन करताना दीड किलोमीटर लांबीचा श्री दर्शनबारी मार्ग उपयोगात आणला जातो.

हा दर्शनबारी मार्ग संपूर्णतः वातानुकूलित आहे. गांवाच्या मध्यातून दर्शनबारीकडे येणाऱ्या मार्गावर दर्शनार्थी भाविकांच्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने मार्गिकांंचे द्वारे श्री दर्शनार्थ मार्गक्रमण करतात.

मार्गिका

मार्गिका

दर्शनार्थींची रांग एकसंध राहण्याकरिता दर्शनमार्गावर मार्गिका उभारलेल्या आहेत. रांगेतून येणाऱ्या भक्तांना (ताटकळत) उभे राहावे लागू नये यासाठी मार्गिकांच्या एका बाजूस बाके लावून भक्तांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांग, आजारी, वयोवृध्द मंडळींना तसेच गर्भवती महिलांना दर्शनाच्या रांगेत उभे राहणे शक्य होत नाही. श्री संस्थेकडून त्यांच्याही दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येते.

या मार्गावर दर्शनार्थी स्त्री-पुरुष भक्तांसाठी ठराविक अंतरावर प्रसाधनगृह व्यवस्था आहे तसेच प्रथमोपचार केंद्र, शिशुचे क्षुधाशमनार्थ मातेकरिता व्यवस्था, थंड पाणी व चहा वितरण हॉल व्यवस्था उपलब्ध असते.

थंड पाण्याचे वितरण

थंड पाण्याचे वितरण

मार्गिकांच्या दोन्ही बाजूस थंड (आर.ओ.फिल्टर्ड) पाण्याचे वितरण करण्यात येते. या द्वारे, सेवाधारी सेवक रांगेतील दर्शनार्थींना पिण्याचे पाणी पुरवतात जेणेकरून तहानलेल्या भक्तांना रांग सोडून बाहेर जावे लागत नाही.

वातानुकूलित व्यवस्था

वातानुकूलित व्यवस्था

श्रींच्या भक्तांकरीता, उकाड्याचा त्रास होऊ नये तसेच हवा खेळती रहावी म्हणून अद्ययावत वातानुकूलित व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

चहा वितरण हॉल

चहा वितरण हॉल

रांगेत बराच काळ उभे राहून थकलेल्या दर्शनार्थी भक्तांचा शीण घालविण्यासाठी चहा वितरित केला जातेो.

प्रथमोपचार केंद्र

प्रथमोपचार केंद्र

आवश्यकता भासल्यास, श्रीभक्तांसाठी दर्शनबारी सभागृहानजिक असलेल्या प्रथमोपचार केंद्रामध्ये औषधोपचाराची सोय उपलब्ध आहे. ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंंदिर परिसरात औषधोपचारांसह 24 तास ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध असते. दर्शनार्थींच्या तब्येतीबाबत कोणतीही आकस्मिक वा अनुचित घटना घडल्यास केवळ 7 ते 10 मिनिटांत रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेचे तात्काळ नियोजन केले जाते.

शिशुचे क्षुधाशमनार्थ मातेकरिता व्यवस्था

शिशुचे क्षुधाशमनार्थ मातेकरिता व्यवस्था

प्रथमोपचार केंद्राजवळच उभारलेल्या तान्ह्या बाळांच्या दुग्धपानासाठी या विशेष कक्षात श्रीदर्शनार्थ आलेल्या मातांकरिता, त्यांना त्यांच्या बाळांना दुग्धपान करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रसाधन गृह

प्रसाधन गृह

श्री भक्तांचे सुविधेकरिता दर्शनबारीत विविध ठिकाणी महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृहांची सोय उपलब्ध आहे. रांगेतील दर्शनार्थींना प्रसाधनगृहाचा उपयोग करावयाचा झाल्यास त्यांच्या हातातील हार, फुले आदी पूजासाहित्य कुठे ठेवावे असा प्रश्न पडतो. या अडचणींचा विचार करून श्री संस्थेतर्फे प्रसाधनगृहांच्या बाहेरील बाजूस स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर अशा लाकडी कप्प्यांची व्यवस्था केलेली आहे. ज्यायोगे दर्शनार्थींना त्यांचे पूजासाहित्य ठेवणे सहजसुलभ होते.

दर्शनबारी मध्ये दर्शनार्थी भक्तांसाठी प्रथमोपचार केंद्र, शिशुचे क्षुधाशमनार्थ मातेकरिता व्यवस्था, थंड पाणी व चहा वितरण हॉल आदी सेवा-व्यवस्था उपलब्ध असते.

वृद्ध व दिव्यांग दर्शनार्थींकरिता सेवार्थ गाडी व्यवस्था उपलब्ध आहे तसेच, दर्शनार्थी स्त्री-पुरुष भक्तांसाठी ठराविक अंतरावर प्रसाधनगृह व्यवस्था उपलब्ध आहे.