• मुख्यपृष्ठ
  • श्री दर्शन
  • श्री महाप्रसाद
  • निवास व्यवस्था
  • कसे पोहोचाल
  • निःशुल्क पार्किंग
  • निःशुल्क बस सेवा
  • नि:शुल्क पादत्राणे कक्ष
  • नि:शुल्क लॉकर सुविधा
  • निःशुल्क जावळे काढणे
  • दैनंदिन कार्यक्रम
  • श्रींचे शाखा
  • देणगी
  • सामान्य प्रश्न
  • श्रींचे समाधी मंदिर
  • श्री मंदिर परिसर
  • श्री वाङमय
  • श्री संस्थान विषयी
  • श्री अवतार कार्य
  • श्री उत्सव
  • सेवाधारी विभाग
  • श्री संस्थान सेवाकार्य
  • श्री संस्थेचे स्वयंपूर्ण व्यवस्थापन
  • अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाला
  • आनंदसागर आध्यात्मिक केंद्र
  • संपर्क
  1. मुख्यपृष्ठ
  2. ‘श्रीं‌’चे समाधी मंदिर

‘श्रीं‌’चे समाधी मंदिर

‘श्रीं‌’चे समाधी मंदिर संगमरवरी दगडी बांधणीचे आहे. हे मंदिर उत्कृष्ट, कोरीव कलाकुसरीने युक्त असून चारही बाजूंना विविध देवदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत. दर्शनबारीच्या माध्यमातून दर्शनार्थींना ‌‘श्रीं‌’चे थेट वां मुखदर्शन घेता येते.

दर्शनबारीतून आलेले भक्त समाधी मंदिरात प्रवेश करतात. पायऱ्यांवरुन उतरत गाभाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत जातांना त्यांना, त्यांच्या आराध्य दैवताचे, श्री महाराजांच्या शांत आणि अलौकिक स्वरूपाचे अगदी ‌‘डोळे भरून‌’ दर्शन घेता येते.

‌‘श्रीं‌’च्या  गाभाऱ्यासमोर नतमस्तकही होता येते.

‌‘श्रीं‌’चे ‌‘मुखदर्शन‌’ घेणाऱ्या दर्शनार्थींना देखील अगदी थोडक्या अंतरावरुन हाच उत्कट अनुभव घेता येतो.

‘श्रीं‌’चे समाधी मंदिर
श्रीराममंदिर

श्रीराममंदिर

‘श्रीं‌’चे दर्शन घेतल्यावर भुयारातून वरील बाजूस असलेल्या श्रीराम मंदिरात प्रवेश करताच, भक्तांना गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापीत प्रभू श्रीरामचंद्र, श्रीसीतामाई आणि श्रीलक्ष्मण यांच्या संगमरवरी शुभ्र विलोभनीय मूर्तींचे दर्शन घडतेे.

या श्रीराम मंदिराचे प्रवेशद्वार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्रीत आहे. येथेच ‌‘श्रीं‌’च्या नित्य वापरातील पादुका तसेच ‌‘श्रीं‌’चे चांदीचे मुखवटे ठेवलेले आहेत.

हे मुखवटे ‌‘श्रीं‌’च्या पालखी सोहळ्यांमध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.

श्रीराममंदिर सभामंडप

श्रीराम मंदिराच्या थेट समोर श्रीहनुमंताची ‌‘दास्य‌’रुपातील मूर्ती आहे. श्रीराम मंदिराचा सभामंडप भव्य व आकर्षक आहे. पाषाणातून कोरलेल्या, कोरीव कलाकुसर असलेल्या दगडी खांबातून सभामंडप साकारलेला आहे.

येथूनच, दर्शनार्थींसाठी ‌‘श्री‌’ समाधी मंदिराबाहेर जाण्याचा मार्ग दिलेला आहे.

श्रीराममंदिर सभामंडप
‘श्रीं‌’चे समाधी मंदिर परिसर

‘श्रीं‌’चे समाधी मंदिर परिसर

‘श्रीं‌’च्या समाधीचे तसेच, श्रीराम-श्रीसीता-श्रीलक्ष्मण आणि श्रीहनुमंताचे दर्शन घेऊन दर्शनार्थी भक्त समाधी मंदिरातून बाहेर येताच चारही बाजूने वेढलेला मोकळा, विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो, जो कायमच भक्तांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

‌‘श्री‌’मंदिराचा ध्वज ः समाधी मंदिरातून बाहेर येताच सर्वप्रथम ‌‘श्रीं‌’च्या ईश्वरीय अवतारकार्याची ग्वाही देणारा सुवर्णांकीत भव्य ध्वज नजरेस पडतेो. श्री संस्थेने उभारलेला सुवर्णांकीत ध्वज हे केवळ धर्मचिन्ह नसून, ‌‘श्रीं‌’च्या परमेश्वरीय चैतन्याचे रुप आहे, भक्तजनांच्या हृदयातील श्रद्धा व भक्तीप्रेमाचे प्रतिक आहे. या ध्वजावर अंकित केलेली ॐ आणि श्री ही मंत्राक्षरे ‌‘श्रीं‌’च्या अनंत कृपेचे आणि सर्वशक्तिमान उपस्थितीचे प्रत्यंतर घडविणारी आहेत. अवकाशाला स्पर्श करणारा हा ध्वज, भक्तांच्या अंतःकरणातील भक्तिभाव जागृत करतो. श्रद्धाभक्तीचा नंदादीप उजळविणारा हा ध्वज श्री संस्थेच्या आध्यात्मिक परंपरेचे तेजोमय प्रतिक आहे, जो भक्तांना सतत ‌‘श्रीं‌’चे स्मरण करण्यास आणि त्यांचेवर अखंड विश्वास ठेवण्यास प्रेरीत करतो.

दर्शनार्थी भक्तजन सुवर्णध्वजासमोर नतमस्तक होताना दिसतात. कित्येक भक्तजन ध्वजाशेजारी असलेल्या झरोक्यातून ‌‘श्री‌’पादुकांचे दर्शन घेताना दिसतात. कुणी ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालतांना दिसतात तर कुणी पाठशाळेच्या चौथऱ्यावर ‌‘श्रीं‌’ च्या सान्निध्यात वेळ सत्कारणी घालवावा या उद्देशाने शांत निवांत बसल्याचे दिसून येते.

कित्येक भक्त चारही बाजूंनी वेढलेल्या पाठशाळांमध्ये देणगी देण्यासाठी, कुणी वाड्मय घेण्यासाठी, तर काही उत्सवप्रसंगी तसेच नित्यनैमित्यिक कार्यप्रसंगी संपन्न होणाऱ्या कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही दिसून येते. समाधी मंदिर परिसर कायमच भक्तजनांच्या अलोट गर्दीने गजबजलेला असतो. श्री भक्तांना प्रदक्षिणा घालतांना अथवा परिसरात वावरतांना उन्हाच्या झळा लागू नयेत तसेच त्यांचे पाय उन्हाने पोळू नयेत या करीता श्री संस्थेने वैशिष्ट्यपूर्ण आच्छादन व्यवस्था केलेली आहे.

‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिराचे मागील बाजूस ‌‘श्रीं‌’चे समाधिग्रहण स्थान तसेच विश्रांतीस्थान आणि पारायण कक्ष आहे.

‘श्रीं‌’चे समाधिग्रहण स्थान

पूर्वकाळी हे ‌‘श्रीं‌’च्या नित्य वास्तव्याचे स्थान होते. भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषिपंचमी) शके 1832, दि. 08 सप्टेंबर 1910 रोजी ‌‘श्रीं‌’नी अवतारकार्याची समाप्ती करतेवेळी या ठिकाणी आपला देह विसर्जित केला. या पावन भूमीचे माहात्म्य अधोरेखित करतांना श्री संस्थेने येथे ‌‘श्रीं‌’चे पवित्र स्मृतीस्थान उभारले आहे. या संगमरवरी दगडी बांधणीच्या चौरस आकारातील पवित्र स्थानाच्या शिरोभागी गोमुख व चांदीच्या पादुका स्थापित आहेत.

‘श्रीं‌’चे समाधिग्रहण स्थान
‘श्रीं‌’चे विश्रांती स्थान

‘श्रीं‌’चे विश्रांती स्थान

‘श्रीं‌’चे समाधिग्रहण स्थानाशेजारी, मागील बाजूस ‌‘श्रीं‌’चे विश्रांतीस्थान आहे. अवतारकार्यार्थ मानवदेह धारण केलेल्या श्रीमहाराजरुपी ‌‘परमेश‌’तत्वाचे, ‌‘सद्गुरु‌’रुपाचे हे लौकिक जगातील ‌‘विश्रांती‌’स्थान होते. पूर्वी येथे असलेल्या पत्र्याच्या झोपडीत ‌‘श्रीं‌’चा नित्य वावर तसेच वास्तव्य असे.

‌‘श्रीं‌’चा नित्य सहवास लाभलेल्या या पवित्रस्थानाचे माहात्म्य जपण्याच्या हेतूने येथे श्री संस्थेने, ‌‘श्रीं‌’चा नित्य बैठकीतील पलंग व गादी ठेवलेली असून त्यावर ‌‘श्रीं‌’च्या प्रासादिक लाकडी पादुका ठेवलेल्या आहेत. मागील बाजूस ‌‘श्रीं‌’ची आशीर्वचन मुद्रेतील भक्तांना अभय देणारी भव्य प्रतिमा आहे.

दर्शनार्थी भक्तांना ‌‘श्री‌’पादुकांवर मस्तक टेकवून ‌‘श्रीं‌’च्या दर्शनस्पर्शाचे समाधान प्राप्त होते. ‌‘श्री‌’दर्शनासाठी केलेल्या प्रयासाचे सार्थकत्व लाभते.

‘श्रीं‌’ची धुनी

‘श्रीं‌’च्या समाधिग्रहण स्थानाशेजारी श्रींची धुनी तसेच ‌‘श्रीं‌’नी हाताळलेले चिमटे भक्तदर्शनार्थ ठेवलेले आहेत.

‌‘श्रीं‌’नी अवतारकार्यादरम्यान प्रज्वलित केलेली ही धुनी आज शतकांहून अधिक काळ लोटला तरीदेखील तितक्याच आवेगाने धगधगते आहे. या धुनीतील विभूती ‌‘श्रीं‌’चे भक्त आपल्या मस्तकी लावून कृतकृत्य होतात.

‘श्रीं‌’ची धुनी
पारायण कक्ष

पारायण कक्ष

येथून समोर दिसणाऱ्या भव्य पारायण कक्षामध्ये एकाचवेळी शेकडो भक्त श्रीगजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत असल्याचे दृश्य दर्शनार्थींच्या मनातील श्रद्धा व सद्भावना जागृत करणारे ठरते.

‌‘श्रीं‌’चे समाधिग्रहण स्थान तसेच विश्रांती स्थानाच्या समोर प्रशस्त जागेमध्ये पारायण कक्ष आहे. श्री दर्शनार्थ येणाऱ्या भक्तजनांस ‌‘श्रीगजानन विजय‌’ ग्रंथाचे पारायण, अध्याय-वाचन करावयाचे असते. त्यांचेकरिता श्री संस्थेने हा पूर्णतः वातानुकूलित पारायण कक्ष उभारलेला आहे.

मंडपाच्या शिरोभागी श्रीशंकराची शांत, निश्चल प्रतिमा साकारलेली असून एका बाजूला, विणाधारी सेवेकरी वीणेचा झंकार उमटवित ‌‘श्रीं‌’चा अखंड नामजप करीत असल्याचे दिसून येते.

पारायण कक्ष..सेवा-सुविधा

पारायण करावयास आलेल्या श्रीभक्तांकरिता, येथे ‌‘श्रीगजानन विजय‌’ हा मूळ मराठी ग्रंथ, अन्य भाषेतील ग्रंथ तसेच प्रार्थना स्तोत्रादी वाड्मय उपलब्ध आहे. श्रीभक्तांना पारायणाकरीता बराच काळ बसावे लागते. सोबतच, विविध वयोगटातील पारायणार्थींची व्याधी, शारीरिक अवस्था व क्षमता यांचा समग्र विचार करुन श्री संस्थेने श्रीभक्तांकरिता सहजसुलभ आसन व बैठक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. लाकडाचे तक्तपोश, ग्रंथ ठेवण्यासाठी व पूजेचे तबक ठेवण्यासाठी लाकडी मेज आदी सुविधा पुरविलेल्या आहेत.

ज्येष्ठ वयस्कर भक्तांसाठी वाचण्यास सुलभ, मोठ्या ठळक अक्षरातील ग्रंथांची व्यवस्था केली असून पारायणार्थी भक्तांकरीता विविध क्रमांकाचे चष्मेदेखील उपलब्ध आहेत. नामजप करणाऱ्या भक्तांकरिता जपमाळा ठेवलेल्या आहेत.

हा कक्ष संपूर्णतः वातानुकूलित असल्याने भक्तांना शांत-निवांत चित्ताने पारायण करणे सोयीचे जाते. शिवाय, श्रींचे सान्निध्य व सहवास लाभलेल्या या वास्तूमध्ये जप, ध्यान, चतन, मनन व पारायण करताना त्यांना वेगळी अनुभूती प्राप्त होते.

येथे एकाचवेळी शेकडो पारायणार्थी विनासायास पारायणार्थ बसू शकतात.

पारायण कक्ष..सेवा-सुविधा
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव
पत्ता

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल.) ता. शेगांव - ४४४२०३ जि. बुलढाणा (महाराष्ट्र )

संपर्क करा

०७२६५-२५२०१८ / २५२२५१ / ०९८८१७५८७६२

sansthan@gajananmaharaj.org

  • श्री गजानन विजय ग्रंथ ( मराठी )
  • श्री गजानन विजय ग्रंथ ( इंग्रजी )
  • फोटो गॅलरी
  • Audit FCRA
नम्र निवेदन
भव्य मंदिर उत्सव साजरा
भव्य मंदिर उत्सव साजरा
मंदिराचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हजारो
मंदिर
मंदिर
मंदिराचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हजारो

© कॉपीराइट २०२६ श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, महाराष्ट्र, भारत. सर्व हक्क राखीव.