श्री क्षेत्र
ओंकारेश्वर
श्री संस्थेने, पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एका भक्तप्रिय अशा श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे शाखा सुरू केली. श्री ओंकारमांधाता आणि श्री ममलेश्वर यांच्या सान्निध्यात श्री संस्थेची ही महाराष्ट्र प्रांताच्या बाहेरील शाखा आहे. येथील परिसर चार एकरांमध्ये विस्तारलेला आहे.
पुढे वाचा
श्री क्षेत्र
गिरडा
भारतातील अनेक सिद्ध तपोभूमींप्रमाणे आध्यात्मिक तेजाने भारलेली श्री क्षेत्र गिरडा भूमी परमपूज्य श्री स्वयंप्रकाश महाराज यांच्या अखंड तपश्चर्येने पवित्र झालेली आहे. पूज्य बाबाजींनी या क्षेत्राचे नामाभिधान ‘श्रीक्षेत्र मोक्षाश्रम पांचझिरा’ असे केले.
पुढे वाचा
श्री क्षेत्र
आडगाव
श्री क्षेत्र आडगाव हे शेगाव-अकोट मार्गावर (तेल्हारा व हिवरखेड मार्गे) स्थित असून, शेगावपासून ७५ कि.मी. अंतरावर आहे. हे स्थान निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्याय ११ नुसार, हे ते पवित्र स्थान आहे जिथे श्रींनी आपले परम भक्त श्री भास्कर पाटील यांना आशीर्वाद दिला होता. महामार्गाच्या डाव्या बाजूस आडगाव येथे श्री भास्कर पाटील समाधी मंदिर स्थित असून, ते श्री गजानन महाराज संस्थान, शेगावमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.पुढे वाचा
श्री क्षेत्र
त्र्यंबकेश्वर
श्री संस्थेने, प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री तीर्थक्षेत्र नाशिक येथील तपोभूमीत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शाखा सुरू केली.
पुढे वाचा
श्री क्षेत्र
पंपासरोवर
सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंंत निर्जन अशा घनदाट वनराईत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखेपासून सुमारे 40 कि.मी. दूर अंतरावर वसलेले, श्री क्षेत्र पंपासरोवर (कपीलधारा क्षेत्र परिसर) हे पवित्र स्थळ भक्तभाविकांना अपार शांतता व अलौकिक समाधान देणारे तसेच ‘श्रीं’च्या अस्तित्वाची दिव्य अनुभूतीही प्रदान करणारे स्थळ आहे.
पुढे वाचा
श्री क्षेत्र
आळंदी
श्री संस्थेने, श्री विठ्ठलभक्तांचे व भागवत संप्रदायाचे परम श्रद्धास्थान असलेल्या संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे संजीवन समाधी स्थान, श्री क्षेत्र देवाची आळंदी या तीर्थक्षेत्र भूमीची शाखारुपाने निवड केली आहे. भागवत धर्माचा प्रसार व्हावा, श्री माऊलींच्या दर्शनार्थ येणाऱ्या वारकऱ्यांकरिता सेवाकार्य घडावे हा श्री संस्थेचा मुख्य हेतू होता. यासाठी श्री संस्थेने, येथे सर्वप्रथम भक्तनिवास उभे करुन आळंदी शाखेद्वारे भविष्यात केल्या जाणाऱ्या सेवाकार्याचा पाया रचलेला आहे.
पुढे वाचा
श्री क्षेत्र
पंढरपूर
संतकवी श्रीदासगणू महाराजांनी ज्याचे वर्णन, ‘सर्व संतांचा कमलनाभ’ असे केलेले आहे त्या श्री क्षेत्र पंढरपूरनिवासी श्री पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये श्री संस्थेेची ही शाखा आहे. या शाखेचा विस्तार साडे आठ एकर परिसरात झालेला असून येथे अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्रांचे (श्रीसीतामाई, श्री लक्ष्मण व श्री हनुमंत यांच्यासह) मंदिरही आहे.
पुढे वाचा