विसावा भक्तनिवास संकुल
.png)
अतिशय विस्तीर्ण व प्रशस्त जागेत उभारलेले हे भक्तनिवास संकुल दर्शनार्थी भक्तांसाठी व दिंड्या, पालखी घेऊन आलेल्या वारकरी बांधवांसाठी सुयोग्य निवास व्यवस्था देणारेे भक्तनिवास संकुल आहे. एकीकडे नाविन्यपूर्ण इमारतींची रचना असलेले निवासी संकुल तर दुसरीकडे लांबचलांब पसरलेला भव्य मोकळा परिसर. ‘श्रीं’च्या समाधी दर्शनासाठी अनेक राज्यांतून विविध मार्गाने लाखो भाविकांच्या पायी दड्या येथे नित्य येत असतात. त्यांच्या राहण्या-जेवण्याची निःशुल्क व्यवस्था विसावा संकुल मध्ये केली जाते. मोठमोठ्या समुहातून येणाऱ्या भाविकांसाठी एकत्रित राहण्याची सोय येथे केली जाते.
येथील भक्तनिवासात एकूण 550 खोल्या उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त गर्दीच्या प्रसंगी अतिरीक्त 5,000 बेड्सची पर्यायी निःशुल्क व्यवस्था करण्यात येते.
भक्तांसह आलेल्या वाहन चालकांकरिता निःशुल्क निवास आणि वाहनांकरीता निःशुल्क पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. येथील भव्य पार्किंग परिसरामध्ये मोठ्या गाड्या, बसेस देखील विनासायास ठेवता येतात. रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता विनामूल्य महाप्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे.

