देणगी विभाग


श्रींचे भक्तांना स्वेच्छेने देणगी अर्पण करता यावी यासाठी चेक, डिमांड ड्राफ्ट, स्वाईप मशीन, यू.पी.आय., मनी ऑर्डर इत्यादी विविध सुविधांची व्यवस्था उपलब्ध आहे.

* श्री संस्थेच्या आर्थिक ‌‘लेखा-जोखा‌’ विषयी निश्चित केलेली कार्यप्रणाली *

01. श्री संस्थेमध्ये करण्यात येणारे ऑडीट - वैधानिक लेखा परिक्षण (Statutory Audit), अंतर्गत लेखा परिक्षण (Internal Audit) व संगणकीय कार्यप्रणालीचे परिक्षण (System Audit) दरवर्षी नियमित केल्या जातात.

02. श्री संस्थेचे दैनिक हिशोब दररोज पुर्ण केल्या जातात.

03. श्री संस्थेच्या खर्चाचे पूर्ण व्यवहार 100 टक्के रोख विरहित (कॅशलेस) आहेत.

04. श्री संस्थेमध्ये सोन्या चांदीचे कुठलेही दागिने स्विकारल्या जात नाहीत.

05. श्री संस्थेकडे FCRA नोंदणी प्रमाणपत्र असून नुतनीकरण झालेले आहे. तथापि, कुठल्याही विदेशी चलनातील देणगी स्विकारल्या जात नाही.

06. श्री संस्थेचा ऑडीट रिपोर्ट 31 मार्च संपताच दरवर्षी नियमित 10 एप्रिल पर्यंत तयार केला जातो व संबंधित शासकीय कार्यालयात दाखल करण्यात येतो.

07. श्री संस्थेमध्ये श्रींच्या आदेशानुसार धन संचय केल्या जात नाही.

08. श्री संस्थेमध्ये आलेले सर्व दान हे जनहितार्थ मानवतेच्या सेवेकरिता 42 सेवाकार्यांच्या माध्यमातून खर्च केल्या जाते.

09. श्री संस्थेमध्ये सोने व चांदी हे संग्रही ठेवल्या जात नाहीत.

10. श्री संस्थेमध्ये दानपेटीत आलेले सोने व चांदीच्या पादुका तयार करून देणगीदार भक्तांना प्रसादरूपाने दिल्या जातात.

श्री संस्थेद्वारे कार्यरत एकूण 42 सेवाकार्य


01) धर्मार्थ ॲलोपॅथी दवाखाना 02) धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना 03) धर्मार्थ आयुर्वेदीक दवाखाना 04) दिव्यांग पुनर्वसन केंद्र 05) फिजिओथेरपी विभाग 06) फिरते रूग्णालय (मोबाईल व्हॅन) 07) फिरते रूग्णालय (मोबाईल व्हॅन आदिवासी विभागाकरिता) 08) नेत्र शस्त्रक्रिया शिबीर 09) प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेल्या परिसरातील ग्रामीण विभागातील रूग्णांकरिता फिरती रूग्णालय सेवा 10) ग्रामिण आरोग्य सेवा योजने अंतर्गत ऑपरेशन करिता बुलढाणा जिल्ह््यातील 12 लाखाहून अधिक गरजू व शेतकरी बांधव या योजनेचे लाभार्थी आहेत. आजपावेतो 52,271 रुग्णांचे विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यात आले. 11) ॲलोपॅथीक, होमिओपॅथीक व आयुर्वेदीक औषधोपचाराचा आजपावेतो 1,81,28,354 रुग्णांनी लाभ घेतला आहे. हे सर्व कार्य सेवाभावनेतून होत आहे 12) श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (कुंभमेळा) येथे यात्रेकरूंच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार केंद्र तथा महाप्रसाद वितरण 13) मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर (कार्तिक मेला व श्री नर्मदा जयंती) येथे यात्रेकरूंच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार केंद्र तथा महाप्रसाद वितरण 14) वेगवेगळ्या गंभीर आजाराने पिडीत रूग्णांकरिता विशेष मार्गदर्शन शिबीरे व मदत 15) राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या लसीकरणाची मोहीम 16) सातपुडा सेवाप्रकल्पांतर्गत अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मुला-मुलींकरिता अंगणवाडी प्रकल्प 17) आत्महत्याग्रस्त शेतकरी व दुर्घटनाग्रस्त वारकरी यांना मदत. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे भोजनासाठी प्रसादरूपी मदत. 18) आदिवासी विभागांत दिपावलीचे निमित्त मिष्टान्नासह वयोगटानुसार श्री कापड प्रसाद वितरण 19) आदिवासींना गरजेनुसार अन्नधान्य वितरण 20) बौद्धिकदृष्ट््या कमकुवत पाल्यांचे विकासासाठी पालक मेळावे तथा मार्गदर्शनपर शिबीर 21) विभागीय नैसर्गिक आपद्ग्रस्तांना मदत भुकंप. पुरपिडीत, दुष्काळ, आगग्रस्त (अग्नीप्रकोप) प्रसंगी सर्वतोपरी साहाय्य 22) दुष्काळग्रस्त विभागातील जनावरांकरिता चारा व पाण्याची व्यवस्था 23) अवर्षणग्रस्त भागाकरिता पिण्याचे पाण्याची व्यवस्था 24) शेतकऱ्यांना शेती उपयोगी मार्गदर्शनाकरिता अभ्यास दौरा 25) कुष्ठरोग्यांचे सेवेतील संस्थेस आर्थिक सहाय्य 26) वारकरी शिक्षण संस्था व लहान मुलांकरिता व्यक्तिमत्व विकास शिबिरे 27) प्रवचन, कीर्तन, दिंडी यात्रा व व्याख्यानाद्वारे आध्यात्मिक प्रबोधन 28) भजनी साहित्य वितरण (टाळ, मृदंग, विणा तसेच संत वाङ्मय वितरण) श्री क्षेत्र शेगांव तसेच श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र आळंदी येथे (आतापावेतो 20,898 गावांना साहित्य वितरण) 29) संत वाङ्मयाचा प्रचार 30) धार्मिक, आध्यात्मिक व योगासन शिबीर 31) ‌‘श्रीं‌’चे दर्शनार्थ पालखी सोहळा आयोजन 32) शेगांवसह संस्थेच्या सर्व अधिकृत शाखांमध्ये 3000 रुम द्वारा भक्तनिवास सेवा 33) दररोज 45 हजार भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसादाचे विनामूल्य वितरण 34) श्री संस्थेद्वारा भाविक भक्तांच्या सुविधेसाठी निःशुल्क वाहनतळ व्यवस्था 35) शेगांव येथे वर्षभर येणाऱ्या भजनी दिंड्यांना सेवार्थ निवास, भोजनप्रसाद व सानुग्रह अंशदान वितरण 36) शेगांव व आजुबाजूचे परिसरातील भूगर्भामधील पाण्याच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न 37) पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण 2,30,000 चे जवळपास 38) वाचनालय 39) 24 तास सेवार्थ बस सेवा उपलब्य 40) सेवार्थ (विनामूल्य) 12 बसेस द्वारा मंदिर बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे करिता 41) सेवार्थ (विनामूल्य) बस सेवा विहार व विसावा संकुल येथे जाणे-येणे करिता 42) लोकहितोपयोगी तसेच राष्ट्रीय हित साधण्याचे दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता विकास, नैतिक विकास व संपूर्ण स्वच्छता अशा कार्यशाळेकरिता कार्य.