निवास व्यवस्था

श्री क्षेत्र शेगांव येथे ‌‘श्रीं‌’च्या समाधी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येत असतात. विविध उत्सवांच्या वेळी, सणासुदीच्या दिवसात तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात येणाऱ्या दर्शनार्थी भाविकांचा ओघ कित्येक पटींनी वाढतो. हे लक्षात घेत श्री संस्थेद्वारे दर्शनार्थी भाविकांना राहण्याकरिता सहज, सुलभ व सुरक्षित सोय उपलब्ध व्हावी या निर्मळ सेवाभावनेने, भक्तनिवास संकुलाच्या माध्यमातून निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे.

श्री संस्थेद्वारे श्री क्षेत्र शेगांव येथे 04 भक्तनिवास संकुले तसेच 04 शाखांमध्येही भक्तनिवास संकुले उभारण्यात आलेली आहेत. श्री क्षेत्र शेगांव येथे ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिरापासून जवळच 03 भक्तनिवास संकुले आणि वारकरी भक्तनिवास संकुलाच्या माध्यमातून तसेच आनंदसागर आध्यात्मिक केंद्र, बाळापूर रोड नजीक विहार आणि विसावा या दोन भव्य भक्तनिवास संकुलांच्या माध्यमातून दर्शनार्थी भक्तांकरिता निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

श्री संस्थेच्या भक्तनिवास संकुलांमध्ये भाविकांच्या गरजेनुसार खोल्या उपलब्ध आहेत. वातावरणातील शांतता, परिसरातील स्वच्छता आणि सर्वत्र जाणवणारा सेवाभावाचा सुगंध यांचे एकत्रित दर्शन श्री संस्थेच्या सर्वच निवास व्यवस्थांमधून आढळते. या सर्व निवास व्यवस्थांमध्ये आरक्षणाची पद्धत नाही. ‌‘जो प्रथम येईल, त्यास प्राधान्य‌’ या तत्त्वावर भाविकांना खोल्या दिल्या जातात. ही निवास व्यवस्था ‌‘श्रीं‌’च्या भक्तांसाठी श्री संस्थेकडून मिळणारी जिव्हाळ्याची सेवा आहे.

समाजाच्या कोणत्याही स्तरातील भक्तमंडळींना उपलब्धतेनुसार ही सेवा प्राप्त होते.

Donation to Shree's Mandir