सेवार्थ नि:शुल्क पार्किंग व्यवस्था आम्ही कोणतेही ऑनलाइन रूम बुकिंग स्वीकारत नाही श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे

विहार भक्तनिवास संकुल

विहार भक्तनिवास संकुल

अतिशय नाविन्यपूर्ण इमारतींची रचना असलेले भक्तनिवास संकुल म्हणून विहार भक्तनिवास संकुल नावलौकिक राखून आहे. या संकुलामधील खोल्यांची रचना निवासी घरकुलांसारखी आहे. भव्य प्रवेशद्वारासमोर असलेले ‌‘विठू माझा लेकुरवाळा‌’ हे भव्य, चित्ताकर्षक शिल्प येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन मोहून टाकते. या संकुल परिसरामधील आध्यात्मिक बैठक असलेली नानाविध रंगांची अप्रतिम शिल्पे लक्षवेधक आहेत. येथील प्रशस्त रस्ते, त्यालगतची हिरवळ व शोभिवंत फुलझाडे, इमारतींची आकर्षक बांधणी तसेच अंतर्बाह्य सजावट पाहून आपण एखाद्या नागरवस्तीतील भव्य गृहसंकुलात आलो आहोत असे वाटत राहते.

येथे येण्यासाठी तसेच येथून रेल्वे स्टेशन, एस.टी. डेपो, विहार आणि विसावा भक्तनिवास संकुलकडे जाण्यासाठी निःशुल्क सेवार्थ बससेवा उपलब्ध आहे.

भक्तांसोबत आलेल्या वाहन चालकांकरिता निःशुल्क निवास व वाहनांकरीता निःशुल्क पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे.

येथे रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता विनामूल्य महाप्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे.