शंका समाधान

सतत विचारले जाणारे प्रश्न

सकाळी मंदिर केव्हा उघडते ?

श्रींचे मंदिर गर्दीनुसार सकाळी ४ ते ५ या दरम्यान उघडण्यात येते.

श्री मंदिरामध्ये दर्शनाकरिता किती वेळ लागतो?

स्वागत कक्षाच्या बाजूला असलेल्या श्री दर्शन बारीचे डिजिटल बोर्डवर वेळेबाबतची अद्यावत माहिती दिलेली असते. त्यानुसार श्रींचे दर्शनाला वेळ लागतो.

श्रींची पालखी केव्हा निघते?

प्रत्येक गुरुवार व दशमीला तसेच श्रींचे उत्सव (श्री प्रगटदिन, श्री रामनवमी, श्री पुण्यतिथी) आषाढी व कार्तिकी एकादशी प्रसंगी श्रींची पालखी निघत असते.

श्रींची संध्याकाळची आरती केव्हा होते?

सूर्यास्ताला.

शेजारतीला श्रींचे समाधीसमोर (भुयारामध्ये) थांबता येते का ?

नाही माऊली, शेजारतीला श्रींचे समाधी समोर (भुयारामध्ये) थांबता येत नाही.

श्री महाराजांचे ग्रंथ कोठे मिळतात?

श्री मंदिराचे आतील परिसरामध्ये उजव्या बाजूला वाङ्मय विभाग आहे. त्या ठिकाणी ग्रंथ मिळतात.

श्रींचा अभिषेक सकाळी किती वाजता चालू होणार?

सकाळी ५।। ते ८.०० या वेळेमध्ये सामुदायिक अभिषेक पूजेकरिता व्यवस्था उपलब्ध आहे.

अभिषेकासाठी काय करावे लागेल?

देणगी काउंटरवर जाऊन अभिषेकाची पावती घेऊन पारायण कक्षामध्ये सकाळी ५.३० ते ८ या वेळे दरम्यान अभिषेक करता येईल.

श्रींचे दर्शनाकरीता मार्ग कुठून आहे?

स्वागत कक्षा जवळील जिन्यावरून जाण्याचा मार्ग आहे. त्या ठिकाणी माहितीचा फलक सुद्धा लावलेला आहे.

श्री महाराजांना गुरु करायचे आहे त्याकरिता काय करावे लागेल?

येथे गुरुशिष्य परंपरा नाही. श्रद्धा भावनेने पारायण कक्षातील श्रींचे गादीवरील पादुकांवर माळ ठेवून गळ्यामध्ये घालू शकता.

जावळे वाहायचे आहे ते कोठे वाहायचे?

जावळे काढण्याची निःशुल्क व्यवस्था महाप्रसादालय इमारतीमध्ये असलेल्या कक्षामध्ये केलेली आहे. त्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ व सायं. ४ ते ६ तसेच गुरुवार व रविवारला सकाळी ९ ते सायं.६ वाजेपर्यंत आहे.

श्रींचे मंदिरामध्ये जाताना पाळीव प्राणी सोबत घेऊन जाऊ शकतो काय?

नाही माऊली.

पहाटेची काकडा आरती किती वाजता होते?

सकाळी ५ वाजता.

श्री मुखदर्शन झाल्यानंतर श्री राम मंदिरात का जाऊ देत नाही?

गर्दीमध्ये जाणे व येणे शक्य नसल्यामुळे व दोन्ही मार्ग वेगवेगळे असल्यामुळे आपण श्री हनुमंत मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊ शकता.

श्रींचे दर्शनास जाताना बंदूक व पिस्तूल सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळेल काय?

श्री संस्थेच्या नियमानुसार परवानगी मिळत नाही.

पूर्वीची लॉकर व्यवस्था बंद का केली?

लॉकर व्यवस्थित ऐवजी अद्यावत सुरक्षागृहाची सेवार्थ (नि:शुल्क) व्यवस्था केली आहे.

श्री मंदिरामध्ये पारायण हॉलमधील गादी घराला (पलंगाला) नारळाचे तोरण लावू शकतो काय?

श्री दर्शनबारीस्थित पूजा साहित्य विभागामध्ये नारळाचे तोरण देऊ शकता.

श्री महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे कोठे जावे लागेल ?

श्री दर्शनबारीमधील पुजा साहित्य विभागामध्ये जाऊन दाखवू शकता.

वाता आणल्या आहेत त्या कोठे द्यायच्या?

श्री दर्शनबारी मधील पुजा साहित्य विभागामध्ये देऊ शकता.

आम्हाला महाराजांना कपडे द्यावयाचे आहे ते वस्त्र व पूजेचे सामान कोठे द्यायचे?

श्री दर्शनबारीमध्ये पुजा साहित्य स्वीकारण्याचा विभाग आहे. त्या ठिकाणी आपण देऊ शकता.

तांबूल (विड्याचा) प्रसाद केव्हा व कुठे मिळतो?

तांबूल (विड्याचा) प्रसाद रात्री शेजारती झाल्यानंतर समाधी दर्शनाच्या लाईन मधून बाहेर येतांना मिळतो.

वयोवृद्ध, अपंग, आजारी, गरोदर महिला यांना श्रींचे दर्शनाची वेगळी व्यवस्था आहे काय?

होय माऊली, बाजूलाच स्वागत कक्ष आहे तेथील सेवकांना माहिती देऊन वयोवृद्ध, दिव्यांग, आजारी व गरोदर महिला यांची श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात येते.

सामूहिक पारायण करण्याची व्यवस्था आहे का?

पारायण कक्षामध्ये नियमानुसार पारायण करता येईल.

पारायण करण्याकरीता बाहेरगावी ग्रंथ मिळतात काय?

नाही माऊली.

श्रींचे दर्शनाकरिता व्ही.आय.पी. पासेसची व्यवस्था आहे काय?

नाही माऊली.

आम्हाला चतुर्थी/ गुरुवार व्रत/ श्री ऋषिपंचमी व्रत उजवायचे आहे त्याकरिता काय करावे लागेल?

माऊली ! येथे आता जागेअभावी चतुर्थी/ गुरुवार व्रत/श्री ऋषिपंचमी व्रत उजविण्याची व्यवस्था उपलब्ध नाही.

माऊली ! विहार भक्तनिवास संकुल व विसावा भक्त निवास संकुल येथील भोजनप्रसाद व नाश्त्याची वेळ काय आहे ?

विहार भ.नि. संकुल:- नाश्ता सकाळी ८ ते १० व दुपारी ४ ते ७ आणि भोजनप्रसाद सकाळी ११ ते २ व सायंकाळी ७ ते १० पर्यंत तसेच रात्री १० ते १२ (महाप्रसाद) मसालाभात व शिराप्रसाद

विसावा भ. नि. संकुल:- नाश्ता सकाळी ७ ते ९:३० आणि भोजनप्रसाद सकाळी ११ ते २:३० व सायं. ७ ते १० पर्यंत तसेच रात्री १० ते १२ महाप्रसाद.

आम्हाला धान्यप्रसाद द्यावयाचा आहे त्याकरीता कुठे जावे लागेल?

माऊली, धान्य प्रसाद स्वीकारण्याकरिता श्री संस्थेच्या अकोट रोड स्थित केंद्रीय भांडारगृह अ. अ. पाकशाळा या विभागामध्ये मेन गेट बाजूला धान्य देणगी कक्ष आहे तेथे आपण धान्य देऊ शकता. ५० किलो पर्यंत असल्यास महाप्रसादालय विभागातील धान्य देणगी कक्षात देता येईल.

फोन करून रूम बुकिंगची व्यवस्था आहे काय?

नाही. प्रत्यक्ष येथे येऊनच नियमानुसार रूम बुकिंगची व्यवस्था होऊ शकते.

आम्हाला जप करण्याकरीता जास्त दिवस राहावयाचे आहे राहता येईल का?

श्री संस्थेचे नियमानुसार संकुल प्रमुखाची परवानगी घेऊन राहता येऊ शकते.

माऊली, साधुसंन्यासींची निवासाची व्यवस्था वारकरी भक्तनिवास संकुल येथे होईल का?

होय माऊली, साधू संन्यासिंची निःशुल्क निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे.

माऊली, वारकरी भक्तनिवास संकुल मध्ये किती वाजेपर्यंत बेड व्यवस्था मिळेल?

माऊली ! वारकरी भ. नि. संकुल येथे २४ तास बेड व्यवस्था उपलब्ध आहे.

वारकरी भक्त निवास संकुल येथे सुरक्षागृहाची व्यवस्था आहे का?

होय. तेथे २४ तास सुरक्षागृहाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे.

वारकरी भ.नि. संकुल येथे आंघोळी करीता गरम पाणी मिळेल का?

होय, सकाळी ३ ते ८ वाजेपर्यंत गरम पाणी व्यवस्था उपलब्ध आहे.

माऊली वाहनतळाची व्यवस्था नि:शुल्क आहे का?

होय.

आम्हाला ऑनलाईन देणगी द्यायची आहे?

माऊली आपण श्री संस्थेच्या अधिकृत वेबसाईट (www.gajananmaharaj.org) वरून देणगी देऊ शकता.

देणगीवर इन्कम टॅक्सची सुविधा आहे काय?

होय, देणगी पावतीवर इन्कम टॅक्सची सूट आहे.

आम्हाला दिंडी घेऊन यावयाचे आहे त्याकरीता काय करावे लागेल?

नैतिक शिक्षण विभागामध्ये जाऊन आपण अर्ज देऊ शकता.

आम्हाला भजन करावयाचे आहे? करता येईल का?

आपण नैतिक शिक्षण विभागामध्ये जाऊन आपला अर्ज देऊन भजन करता येईल.

आम्हाला भजनी साहित्य मिळेल काय?

श्री संस्थेच्या नियमानुसार भजनी साहित्य मिळू शकते. नैतिक शिक्षण विभागात जाऊन सविस्तर माहिती घ्यावी.

बिसलेरी वॉटर कुठे मिळते?

माऊली, श्री मंदिर परिसरामध्ये सर्व ठिकाणी आर.ओ. वॉटरची व्यवस्था उपलब्ध आहे.

श्री संस्थांन तर्फे वृद्धाश्रमाची सोय आहे काय?

नाही. परंतु श्री संस्था वृद्धाश्रमांना वेळोवेळी मदत करीत असते.

श्री संस्थेतर्फे लहान मुलांच्या वस्तीगृहाची सोय आहे काय ?

नाही. परंतु श्री संस्था लहान मुलांच्या वस्तीगृहांना वेळोवेळी मदत करीत असते.

आमच्या दिव्यांग भक्तांकरीता व्हीलचेअर मिळेल काय?

होय, मेनगेटवर व्हीलचेअर ठेवलेल्या आहेत. त्या आपण घेऊ शकता.