श्री महाप्रसादालय विभाग
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. उपनिषदांमध्ये ‘अन्नाची अवहेलना करू नये’ असे वचन आहे.
‘श्रीं’नी त्यांच्या अवतारकार्याचा प्रारंभ करतेवेळी, ‘अन्नम् ब्रह्मेती’ हे चिरंतन शाश्वत सत्य, उष्ट्या पत्रावळींवरील भातशीते वेचून ग्रहण करण्याच्या कृतीतून सिद्ध केले होते.
श्रींच्या ‘अन्नम् ब्रह्मेती’ या शिकवणीनुसार श्री संस्थेने दर्शनार्थी भक्तांकरिता महाप्रसादाची व्यवस्था पूर्वापार अखंड सुरू ठेवली आहे. श्रींच्या समाधी मंदिर परिसरात श्री संस्थेने, भव्य महाप्रसादालयाची उभारणी केली आहे. एकाचवेळी 5000 भक्त ‘श्रीं’चा महाप्रसाद घेण्यासाठी बसू शकतील अशी आसनव्यवस्था येथे उपलब्ध आहे.
श्री दर्शनार्थ आलेल्या भक्तांचा महाप्रसाद घेण्यासाठी अखंड ओघ नित्य निरंतर सुरू असतो.
भक्तमंडळींना ‘श्रीं’चा महाप्रसाद दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत श्रीसंस्थेकडून विनामूल्य वितरीत करण्यात येतो. या महाप्रसादामध्ये पोळी, भाजी, पिठले, वरणभात तसेच एक मिष्टान्नादी पदार्थांचा समावेश असतो. उपवासाच्या दिवशी फराळाची व्यवस्था असते. दररोज सरासरी 30-35 हजाराहून अधिक भक्त ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतात. ‘श्रीं’चे समाधी मंदिर आणि श्री संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिळून दररोज सरासरी 50,000 हून अधिक भक्त ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतात.
‘श्रीं’चा प्रगटदिन व पुण्यतिथी उत्सव तसेच श्रीरामनवमी या तीन विशेष उत्सवानिमित्त येणाऱ्या भक्तांची संख्या 03 ते 05 लाख अथवा त्यापेक्षाही जास्त राहते. अशावेळी सर्व भक्तांना ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ व्हावा या करिता महाप्रसादालय विभागाकडून विशेष नियोजन करण्यात येते.
‘श्रीं’च्या महाप्रसादासाठी वर्षभर 50,000 क्विंटलपेक्षा जास्त धान्य-कडधान्ये, किराणा व भाजीपाला असे साहित्य उपयोगात येते. याकरीता श्री संस्थेचा अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज असा स्वतंत्र ‘सेंट्रल किचन विभाग’ अखंड कार्यरत असतो आणि त्याद्वारे स्वच्छतेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळून ‘श्रीं’चा महाप्रसाद तयार करण्यात येतो.
अल्पोपहार व भोजनप्रसाद व्यवस्था
‘श्रीं’च्या समाधी मंदिर परिसर येथे श्री महाप्रसादालयामध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत ‘श्रीं’च्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.
भक्तनिवास संकुल, विसावा भक्तनिवास संकुल, विहार भक्तनिवास संकुल आणि वारकरी भक्तनिवास संकुल येथील सर्व प्रसादालयांमध्ये दुपारी व सायंकाळी भोजनप्रसादाची तसेच सकाळी व दुपारी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येते.
| क्र. | विभाग | विवरण | वेळ |
|---|---|---|---|
| १ | मंदिर परिसर (श्री महाप्रसादालय) |
श्री महाप्रसाद | स. १०.०० ते सायं. ५.०० |
| २ | भक्तनिवास संकुल (प्रसादालय) |
अल्पोपहार | स. ७.०० ते १०.०० |
| भोजनप्रसाद | स. ११.०० ते २.०० सायं. ६.३० ते १०.०० |
||
| ३ | विसावा भक्तनिवास संकुल (प्रसादालय) |
अल्पोपहार | स. ७.०० ते ९.३० |
| भोजनप्रसाद | स. ११.०० ते २.३० सायं. ७.०० ते १०.०० |
||
| ४ | विहार भक्तनिवास संकुल (प्रसादालय) |
अल्पोपहार | स. ८.०० ते १०.०० दु. ४.०० ते ७.०० |
| भोजनप्रसाद | स. ११.०० ते २.०० सायं. ७.०० ते १०.०० |
||
| ५ | वारकरी भक्तनिवास संकुल (प्रसादालय) |
अल्पोपहार | स. ५.०० ते ८.३० सायं. ५.०० ते १०.०० |
