संस्थानचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य

संस्थानचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य

स्वामी विवेकानंद यांच्या ‌‘शिवभावे जिवसेवा‌’ या बोधवचनाने प्रेरित होऊन श्री संस्थेने रूग्णसेवा हीच परमोच्च मानवसेवा हे ध्येय निश्चित केले. या सेवाकार्यांतर्गत गरजू रुग्णांना निःशुल्क औषधोपचार आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा श्री संस्थेचा जनहितार्थ संकल्प आहे.

या सेवाकार्याच्या माध्यमातून श्री संस्थेद्वारे सेवार्थ रुग्णालय, फिरते रूग्णालय आणि ग्रामीण आरोग्य सेवा योजना अशा तीन सेवा कार्यरत आहेत. ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून श्री संस्थेने ‌‘शिवभावे जिवसेवा‌’ हे बोधवचन प्रत्यक्षात साकारले आहे. सोबतच, आरोग्यसेवा देण्याकरीता भव्य सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारणे, जिथे वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही अशा दुर्गम भागात फिरते रूग्णालय पाठविणे आणि बुलढाणा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ऑपरेशनकरिता आर्थिक साहाय्य करणे हा श्री संस्थेच्या वैद्यकीय सेवाकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

रुग्णालय

खामगाव रोडवर श्री संस्थेने अतिशय अद्ययावत तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे एक लाख स्क्वेअर फुटाचे भव्य रुग्णालय उभारलेले आहे. येथे ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचार पद्धती तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून गरजू रूग्णांना सेवा दिली जाते. या रुग्णसेवेकरिता वरील आरोग्यपद्धतींशी संबंधित श्री संस्थेच्या समर्पित डॉक्टरांसह एकूण 76 तज्ञ मानसेवी डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय सेवा रुजू करतात. दररोज सरासरी 2,100 रूग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. आजपावेतो 1,81,28,354 गरजू रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतलेला आहे.

 

उपचार आणि सेवासुविधा

‌‘श्रीं‌’च्या आशिर्वादाने, श्री संस्थेद्वारे रूग्णसेवा हेच ईश्वरसेवेचे परमोच्च साधन मानून रूग्ण तसेच समाजासाठी विविध उपचारसुविधा समर्पित करण्यात आलेल्या आहेत. या वैद्यकीय सेवांद्वारे करूणा, समर्पण आणि सेवाभाव यांचा समन्वय साधण्यात आला आहे.

या रुग्णालयामध्ये खालील रोग-व्याधी-विकार यांवरील चिकित्सात्मक उपचार आणि सेवा-सुविधा अखंडीतपणे सुरू आहेत.

रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुविधा घेण्याकरिता आलेल्या रुग्णांची नोंदणी पुढील प्रकारे केली जाते.