श्री प्रगटदिन उत्सव
माघ वद्य सप्तमी (23 फेब्रुवारी 1878) या पुण्यप्रद तिथीस श्री महाराज शेगाव मध्ये प्रगट झाले म्हणून ही तिथी ‘श्रीं’चा प्रगटदिनोत्सव म्हणून साजरी करण्यात येते. या दिवशी ‘श्रीं’नी प्रथमच समस्त जगताकरिता आपले ईश्वरीय रुप प्रगट केले आणि भक्तांच्या जीवनात भक्ती, ज्ञान आणि करुणेचा चैतन्यदीप उजळविला. म्हणूनच, ‘श्रीं’चा हा प्रगटदिनोत्सव ‘श्रीं’चे जगभरातील भक्तजन अपार श्रद्धाभक्तीने व उत्साहाने साजरा करतात.
या प्रगटदिनोत्सव प्रसंगी माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य सप्तमी या कालावधीत श्री महारुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात येते. जाते. उत्सवाच्या परमोच्च क्षणी यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान विधीवत संपन्न केले जाते. दुपारी 10 ते 12 या कालावधीत होणाऱ्या श्री प्रगटदिनोत्सवाच्या कीर्तनात ‘श्रीं’च्या अलौकिक लीलांचे माहात्म्य गायले जातेे. दुपारी 12 वाजता सर्व भक्तजनांच्या उपस्थितीत श्रींचा प्रगटदिनोत्सव मंगल व दिव्य अशा वातावरणात साजरा केला जातो.
