श्रीराम जन्मोत्सव
श्रीराम जन्मोत्सवाचा प्रारंभ ‘श्रीं’च्या समक्ष आणि त्यांच्याच पुढाकाराने झाला. चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध नवमी या कालावधीत श्री अध्यात्म रामायण स्वाहाकार संपन्न होतो. मंदिर परिसरात, श्रीरामनामाच्या अखंड जपातून निर्माण झालेल्या सात्विकतेला साक्षी ठेवत दुपारी 10 ते 12 या वेळेत श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होते. श्रीरामरायांचा आदर्श, मर्यादा व चरित्र यांचे माहात्म्य भक्तांच्या अंतःकरणात जागवून दुपारी 12 वा. श्रीरामजन्मोत्सवाचा मंगल क्षण साजरा संपन्न होतो.
