सर्वे भवन्तु सुखिनः॥
आपल्या उदार देणगीमुळे आम्हाला आमचे आध्यात्मिक, सामाजिक आणि समाजकल्याणाचे उपक्रम पुढे सुरू ठेवण्यास मदत होते. चला, आपण सर्व मिळून सद्भावना पसरवूया आणि अनेकांचे जीवन उन्नत करूया.
श्रीगजानन महाराज संस्थान (शेगांव)
दि. 12 सप्टेंबर 1908 रोजी, श्री गजानन महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे या मूळ उद्देशाने प्रेरीत होऊन ‘श्रीं’चे समक्ष, 12 विश्वस्तांच्या एकमताने ‘श्रीगजानन महाराज संस्थान, शेगांव’ ही विश्वस्त संस्था स्थापन झाली.
श्री महाराज देहावतारात साक्षात असतांना त्यांच्या समक्ष ‘श्री’संस्थेची स्थापना झाली, ही अत्यंत अलौकीक आणि वैशिष्टयपूर्ण ‘घटना’ आहे.
श्री महाराजांनी ज्या जागेकडे निर्देश करुन ‘या जागी राहील रे’ असे सांगितले त्याच जागी पुढे ‘श्रीं’चे समाधी मंदिर उभारण्यात आले.
‘श्रीं’च्या तत्कालीन परमभक्तांकडून, कै. नारायण कडताजी पाटील, यांच्या शेगांव येथील अडत दुकानावर ‘श्रीं’चे भक्त तसेच शेगांवचे ग्रामस्थ अशा सर्वांची एक संयुक्त सभा आयोजित करण्यात आली.
आश्विन शुद्ध प्रतिपदा दि. 27/09/1908 रोजी ‘श्री’ संस्थानातील सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्याकरिता ‘श्री’ संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. अल्पावधीत, वाडेगांव-बाळापूर परिसरातून आणलेल्या काळ्या पाषाणांतून नागपूर येथील शिल्पकार कै. किसन मिस्त्री व कै. खंडू मिस्त्री यांनी अत्यंत आखीव-रेखीव स्वरुपातील कोरीव शिल्पकलेशी समन्वय साधून भव्य सभामंडप आणि ‘श्रीं’चे समाधी मंदिर निर्माण केले.
सन 2010 मध्ये ‘श्रीं’च्या समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून ‘श्रीं’च्या समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. भक्तजनांची वाढती गर्दी व आगामी काळाची नेमकी गरज ओळखून श्री संस्थेने संगमरवरी दगडी बांधणीतील ‘श्रीं’च्या समाधी मंदिराचे पुनःनिर्माण केले.
श्री क्षेत्र शेगांव ‘भक्तनगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या पावननगरीत ‘श्री’’च्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी नित्य हजारो भाविक दाखल होतात. या दर्शनार्थींना ‘श्री’’च्या दर्शनाचा लाभ विनासायास व्हावा यासाठी श्री संस्थेने ‘दर्शनबारी’ ही भव्य वास्तू निर्माण केली आहे.
दर्शनबारीच्या माध्यमातून एकाचवेळी हजारो भाविकांना ‘श्री’’चे दर्शन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते.
‘श्री’’च्या समाधी दर्शनार्थ आलेल्या भक्तजनांना श्री दर्शनबारीच्या माध्यमातून
‘श्री’’चे थेट नामस्मरणातील दर्शन तसेच ‘श्री’’चे मुखदर्शन घेण्याची व्यवस्था आहे.
‘श्री’’चे थेट तसेच मुखदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तजनांच्या माहिती करिता
‘श्री दर्शनार्थ किती वेळ लागेल’ हे सूचित करणारा फलक लावलेला आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. उपनिषदांमध्ये ‘अन्नाची अवहेलना करू नये’ असे वचन आहे.
‘श्रीं’नी त्यांच्या अवतारकार्याचा प्रारंभ करतेवेळी, ‘अन्नम् ब्रह्मेती’ हे चिरंतन शाश्वत सत्य, उष्ट्या पत्रावळींवरील भातशीते वेचून ग्रहण करण्याच्या कृतीतून सिद्ध केले होते.
श्रींच्या ‘अन्नम् ब्रह्मेती’ या शिकवणीनुसार श्री संस्थेने दर्शनार्थी भक्तांकरिता महाप्रसादाची व्यवस्था पूर्वापार अखंड सुरू ठेवली आहे. श्रींच्या समाधी मंदिर परिसरात श्री संस्थेने, भव्य महाप्रसादालयाची उभारणी केली आहे. एकाचवेळी 5000 भक्त ‘श्रीं’चा महाप्रसाद घेण्यासाठी बसू शकतील अशी आसनव्यवस्था येथे उपलब्ध आहे.
श्री दर्शनार्थ आलेल्या भक्तांचा महाप्रसाद घेण्यासाठी अखंड ओघ नित्य निरंतर सुरू असतो.
भक्तमंडळींना ‘श्रीं’चा महाप्रसाद दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत श्रीसंस्थेकडून विनामूल्य वितरीत करण्यात येतो. या महाप्रसादामध्ये पोळी, भाजी, पिठले, वरणभात तसेच एक मिष्टान्नादी पदार्थांचा समावेश असतो. उपवासाच्या दिवशी फराळाची व्यवस्था असते. दररोज सरासरी 30-35 हजाराहून अधिक भक्त ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतात. ‘श्रीं’चे समाधी मंदिर आणि श्री संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिळून दररोज सरासरी 50,000 हून अधिक भक्त ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतात.
शेगाव येथील श्री मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच आपल्याला सुंदर कलाकुसरीने नटलेले भव्य प्रवेशद्वार, आकर्षक छताची कोरीव कलाकुसर आणि विविध मंदिरे दिसून येतात.
आपल्या उदार देणगीमुळे आम्हाला आमचे आध्यात्मिक, सामाजिक आणि समाजकल्याणाचे उपक्रम पुढे सुरू ठेवण्यास मदत होते. चला, आपण सर्व मिळून सद्भावना पसरवूया आणि अनेकांचे जीवन उन्नत करूया.
श्री क्षेत्र शेगांव येथे ‘श्रीं’च्या समाधी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येत असतात. विविध उत्सवांच्या वेळी, सणासुदीच्या दिवसात तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात येणाऱ्या दर्शनार्थी भाविकांचा ओघ कित्येक पटींनी वाढतो. हे लक्षात घेत श्री संस्थेद्वारे दर्शनार्थी भाविकांना राहण्याकरिता सहज, सुलभ व सुरक्षित सोय उपलब्ध व्हावी या निर्मळ सेवाभावनेने, भक्तनिवास संकुलाच्या माध्यमातून निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे.
‘श्रीं’चे समाधी मंदिर आणि भक्तनिवास संकुल परिसराजवळ भक्तांच्या सोयीकरिता भव्य व प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था श्री संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. आधुनिक ॲटोमेशन प्रणालीसह सुसज्ज अशा या वाहनतळामध्ये दररोज सुमारे 5.000 वाहनांचे आवागमन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येते. ‘श्रीं’चे भक्तांसाठी ही संपूर्ण सेवा निःशुल्क स्वरुपात उपलब्ध आहे. या सोबतच, श्री संस्थेने सर्व भक्तनिवास संकुल परिसरामध्ये देखील सेवार्थ वाहनतळ सेवा निःशुल्क उपलब्ध करुन दिलेली आहे.
श्रींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता श्री संस्थानद्वारा श्री मंदिर ते बस स्टँड, रेल्वे स्टेशन, आनंदविहार तसेच विसावा भक्तनिवास संकुल येथे ये-जा करण्यासाठी विनामूल्य बस सेवा उपलब्ध आहे.
श्रींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधेच्या दृष्टीने श्री मंदिर परिसरात पादत्राणे ठेवण्यासाठी निःशुल्क व्यवस्था उपलब्ध आहे.
श्री भक्तांच्या सुविधेसाठी श्री संस्थानतर्फे श्री मंदिर परिसर तसेच भक्तनिवास संकुलात निःशुल्क सुरक्षागृहाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री संस्थानची शाखा
महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि तीर्थक्षेत्रे शेगावशी जोडलेली आहेत. रेल्वे स्थानकाच्या आवारात एक चौकशी कक्ष (Enquiry Booth) आहे, जिथून भाविक मार्गदर्शन मिळवू शकतात. तसेच, श्री मंदिराच्या वाटेवरच बस स्थानकही वसलेले आहे.
दिल्ली - मुंबई - छत्रपती संभाजीनगर, बेंगळुरू - मुंबई - छत्रपती संभाजीनगर (सर्वात जवळचे विमानतळ). शेगाव 225 किमी अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगरहून सुमारे 4 तासांचा रेल्वे प्रवास.
दिल्ली - नागपूर, चेन्नई - नागपूर आणि कोलकाता - नागपूर. शेगाव 300 किमी अंतरावर आहे. नागपूरहून सुमारे 6 तासांचा रस्त्याने किंवा 4.30 तासांचा रेल्वे प्रवास.