श्री प्रगटस्थळ
माघ वद्य सप्तमी (23 फेब्रुवारी 1878) या पुण्यप्रद तिथीस श्री महाराज शेगावातील भव्य वटवृक्षाखाली प्रगट झाले.
शेगाववासियांना ‘श्रीं’चे प्रथम दर्शन जेथे घडले तिथे श्री संस्थेकडून ‘श्रीं’ची प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्री पादुका स्थापित असून ‘श्रीं’च्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्प साकारण्यात आले आहे. येथे श्री संस्थेचे समृद्ध वाचनालयही आहे.
