श्री हरिहर मंदिर (श्री शिवमंदिर)
ज्ञात माहितीनुसार, श्रीविष्णू व श्रीशंकर (हरिहर) यांचे एकत्रित मंदिर ‘श्रीं’चा जुना मठ म्हणून प्रसिद्ध होते. पूर्वी मोटे सावकार यांनी जिर्णोद्धार केल्याने हे मूळ श्रीहरिहर मंदिर मोट्यांचे शिवमंदिर म्हणून ओळखण्यात येऊ लागले. ‘श्रीं’नी काही काळ येथे वास्तव्य केले होते. त्यांच्या अवतारकार्यातील अनेक लीला येथे घडल्या. श्री. मोटे यांनी हे मंदिर श्री संस्थेत विलीन केले. पुढे, श्री संस्थेने या प्राचीन शिवालयाचा जिर्णोद्धार करून येथे उत्कृष्ट कलाकुसर युक्त संगमरवरी दगडी बांधणीचे मंदिर बांधले. येथे ‘श्रीं’च्या गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.
