श्री बंकट सदन
शेगावांत, ‘श्रीं’चे प्रथम दर्शन बंकटलाल यांना घडले. पुढे त्यांच्याच घरी ‘श्रीं’चे प्रत्यक्ष वास्तव्य झाले व अवतारकार्यातील अनेक लीला घडल्या. ‘श्रीं’चे वास्तव्य लाभलेल्या या वास्तूचे पावित्र्य जोपासले जावे या हेतूने श्री संस्थेद्वारे येथे तीन मजली स्मृतीस्थळ बांध्ाण्यात आले ‘बंकट सदन’ म्हणून हे ओळखले जाते. येथे श्री पादुका व प्रतिमा पलंगावर विराजमान असून प्रतिदिनी सकाळ-सायंकाळ ‘श्रीं’ची पूजा व आरती केली जाते.
