श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती

।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
(चाल आरती भुवनसुंदराची )

 

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।। देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।। ।।चाल।। भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।। करूनी भय हरण, दावी सुख सदन ।। अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।। जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।। ही जड मुढ मनुज -काया Ÿ। पदीं तव अर्पियली राया ।।चाल।। हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।। पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।। नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।। करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह - पटल माया ।। चाल ।। गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत । विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दुर करू सदया ।।३।।
 

आरती

 

आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था । आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।। दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा, पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।। कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित अ‍ैसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।

 

कापुरार्ती

 

जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।। धृ।। भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा।। इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१।। श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा । भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।२।। मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा । काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।। शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।। तारी जय जयकर्पूरगौंरा कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं । सदा वसंतं हृदयारqवदे ।भवं भवान्यासाहित नमामि ।। मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।। नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी
 

श्लोक (वृत्त-शिखरिणी)

 

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।
 

श्लोक (वृत्त-भुजंगप्रयात)

 

सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेची आता ।।१।।

उपासनेला दृढ चालवावे । भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।
 

अष्टक (दासगणूकृत)

 

गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।

निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।

अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन । समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।

क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।

अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।

समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।

सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां । जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।

अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो । पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
 

श्लोक (वृत्त -इंद्रवज्रा)

 

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे । त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही
 

प्रदक्षिणा

 

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।
 

क्षमापनम्

 

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् । पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
 

जय जय रघुवीर समर्थ

 

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ऽ ऽ…

 

मंत्रपुष्पांजली

 

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।।ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दतातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । सामराज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्य, पारमेष्ट्यं राज्यंमहा राज्यमहा धिपत्यमयं समंत पर्याईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्याताया एकराळिति । तदप्येष श्लोको ऽ भिगीतो मरूतः परिवेष्टारो मरूतस्या ऽ वसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रम्हाय धिमही, तन्नो सद्गुरू प्रचोदयात ।।