वारकरी व्यवस्था

श्री संस्थेद्वारे गजानन महाराजांचेश्रीच्या प्रकटदिनोत्सव, श्रीराम जन्मोत्सव तसेचश्रीच्या पुण्यतिथी उत्सव (ऋषिपंचमी) हे तीन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी आपापल्या दिंडी घेऊन येतात. श्रींच्या वारी वारकऱ्यांची आवश्यक त्या प्राथमिक सुविधांची सुंदर अशी व्यवस्था करण्यात येते.

 

 वारकरी व्यवस्था

इतर सुविधा

पिण्याचे पाणी व्यवस्था

पिण्याचे पाणी व्यवस्था

श्रीच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची (आर..) २४ तास व्यवस्था करण्यात येते. दिंडी नोंदणी, पार्किंग परिसर, प्रसादालय, दवाखाना, अंशदान मंडप मंडपांच्या संख्येनुसार प्रत्येक मंडपाजवळ निर्जंतुकीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते.

प्रसाधन व्यवस्था

प्रसाधन व्यवस्था

वारकरी भक्तांच्या सोयीकरिता परिसराच्या जवळ महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात येते. येथे आरोग्यविषयक सोयीसुविधांकडेही विशेष लक्ष पुरविण्यात येते.

 विद्युत व्यवस्था

विद्युत व्यवस्था

निवास परिसरात विद्युत विभागाकडून लाईट, फोकस, स्पीकर्स लावण्यात येतात. लाईन गेल्यास अतिरिक्त जनरेटरची व्यवस्थाही केलेली असते. ही सर्व व्यवस्था करीत असताना काही अपघात होऊ नये याचीही विशेष दक्षता घेतली जाते. विद्युत व्यवस्थेवर देखरेख करण्याकरिता स्वतंत्र देखरेख सेवकाची नियुक्ती करण्यात येते.

 कीर्तन व्यवस्था

कीर्तन व्यवस्था

उत्सवामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना उत्सवाच्या दिवशी कीर्तन श्रवणाचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून विसावा किंवा विहार यापैकी एका परिसरामध्ये कीर्तनाची व्यवस्था करण्यात येते. कीर्तनाकरिता नैतिक शिक्षण विभागामार्फत निमंत्रीत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन ठेवण्यात येते. कीर्तनाची व्यवस्था वारकरी भोजन मंडपामध्ये करण्यात येते. कीर्तनाची वेळ रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ठेवण्यात येते.