श्लोक (वृत्त-शिखरिणी)

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।
 

श्लोक (वृत्त-भुजंगप्रयात)

सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेची आता ।।१।।

उपासनेला दृढ चालवावे । भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।
 

अष्टक (दासगणूकृत)

गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।

निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।

अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन । समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।

क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।

अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।

समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।

सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां । जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।

अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो । पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।

 

श्लोक (वृत्त -इंद्रवज्रा)

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे । त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही
 

प्रदक्षिणा

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

 

क्षमापनम्

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् । पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् । पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।