
संतश्रेष्ठांनी ज्या वारकरी संप्रदायाचा गौरवाने पुनरुच्चार केला, त्या संप्रदायास व्यापक परिमाण लाभावे या हेतूने श्री संस्थेने वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. वारकरी संप्रदायाबद्दल विशेष ममत्वभाव असल्याने श्री संस्थेतर्फे विविध गावांमधील भजनी दड्यांना नियम-पूर्तता केल्यावर 10 टाळजोड, 01 मृदंग, 01 विणा असे भजनी साहित्य विनामूल्य वितरित करण्यात येते.
तसेच वारकरी दड्यांना आवश्यकतेनुसार श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत तसेच श्री तुकाराम गाथा यांसारख्या अद्वितीय ग्रंथांच्या प्रती विनामूल्य वितरित केल्या जातात.
श्री संस्थेच्या या सेवाकार्यामुळे गावोगावी भजने, हरिपाठ, काकडा, कीर्तने आदी ध्ाार्म्ािक कार्ये सुरू झाली. वारकरी संप्रदायाचा प्रसार, प्रचार होवून असंख्य भक्तजन भक्तीप्रेमाचा आनंद घेत असल्याचे आढळून आले. हे आध्यात्मिक सेवाकार्य महत्त्वपूर्ण असून या सेवाकार्याच्या माध्यमातून श्री संस्थेद्वारे ध्ार्म, संस्कृती व अध्यात्म यांचे जतन होत आहे.
आजपावेतो 20,898 गावांना भजनी साहित्य वितरीत करण्यात आले आहे. ‘श्रीं’चा प्रगटदिनोत्सव, श्रीराम जन्मोत्सव व ‘श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना नियमांनुसार भजनी साहित्य व संत वाङ्मयाचे वितरण करण्यात येते.
